LIVE UPDATES

बांदा पत्रादेवी रस्त्याची चाळण

ग्रामस्थांची डागडुजीची मागणी
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 16, 2026 17:29 PM
views 40  views

बांदा : बांदा पत्रादेवीहुन गोव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे पडून रस्ता वाहतुकीस पूर्णपणे धोकादायक बनला आहे. गणेश चतुर्थी तोंडावर आली असून याच खड्ड्यातून गणेश मूर्ती न्यायाची काय ? असा सवाल स्थानिकांमधून  विचारला जातोय. त्यामुळे चतुर्थीपूर्वी त्या रस्त्याची डागडुजी करा अशी मागणी होतेय.   

वारंवार याबाबत सत्ताधारी, ग्रामपंचायत, बांधकाम विभाग यांच्याकडे मागणी करून देखील याकडे दुर्लक्ष केला जातं असल्याचा आरोप होतोय. आम सभेत ग्रा. पं. सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.