LIVE UPDATES

जि. प. शाळा कुंब्रल नंबर ०३ मध्ये 'प्रवेशोत्सव' उत्साहात

पटसंख्या वाढली
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 16, 2026 18:54 PM
views 35  views

दोडामार्ग :  ग्रामीण भागातील शाळा असून सुद्धा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल दहा संख्येने पट वाढला हे ग्रामस्थ आणि शिक्षकांचं कार्य कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्गार बाबुराव धुरी यांनी काढले कुंब्रल नंबर 3 शाळेसाठी यावर्षी  2 लाख 50 हजार रुपये एवढा निधी ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिला. त्याशिवाय मुलांना दप्तर, पाणी बॉटल, छत्री,सँडल अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप माजी विद्यार्थी संघामार्फत करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच प्रवीण परब, विद्यमान सरपंच जनार्दन गोरे उपस्थित होते. लोकसहभाग मिळवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असु, सामाजिक बांधिलकी जपणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. शिक्षक पालक आणि समाज यातूनच शाळेचा विकास होत असतो असं मत माजी सरपंच तथा माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष प्रवीण परब यांनी व्यक्त केले.

प्रवीण परब यांचे कार्य कौतुकास्पद आहे. नेहमीच शाळेसाठी ते झटत असतात. सामाजिक बांधीलकी जपणारा माणूस आहे असे गौरवोद्गार सरपंच जनार्दन गोरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मणिपाल राऊळ यांनी केले. सूत्रसंचालन घाटविसावे सर व आभार प्रदर्शन दत्तप्रसाद देसाई यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य संजय परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भार्गवी परब, प्रकाश नाईक, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावर्षी इयत्ता पहिली मध्ये दाखल झालेल्या मुलांचे स्वागत करण्यात आले. सर्व मुलांसाठी शासनामार्फत पुस्तके गणवेश यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.