LIVE UPDATES

अबिद नाईकांनी केले पार्थ पवारांचे अभिनंदन

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 16, 2026 18:27 PM
views 27  views

कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिझ नाईक यांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस पार्थ पवार यांची भेट घेऊन खासदार झाल्याबद्दल अभिनंदन केले. मुंबई येथे स्वर्गीय अजितदादा यांच्या देवगिरी या बंगल्यावर नाईक यांनी पार्थ पवार यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी संघटनेबाबतीत चर्चा झाली. त्यावेळी पार्थ पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या पाठीशी  खंबीरपणे राहणार असल्याचे आश्वासन दिले.