
- कोकणसादने केला होता घाटांचा 'स्पॉट पंचनामा'
सावंतवाडी : आंबोली घाटात धोकादायक स्थितीमध्ये दरड असून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंतांचे लक्ष वेधले आहे. कोकणसादने या घाटांचा स्पॉट पंचनामा केला होता. या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.
आंबोली गाव हद्दीतील धोकादायक झाडे राष्ट्रीय महामार्ग व वन विभाग यांच्या संयुक्त अभियान राबवून छाटण्यात आली आहेत. याबाबत सौ. पालेकर यांनी मागणी केली होती. याला यश मिळाल्याने त्यांनी आभार व्यक्त केलेत. तसेच आंबोली घाटात श्री देव पूर्वीचा वस मंदिर च्या पुढील बाजूस धोकादायक स्थितीत दगड पडण्याच्या अवस्थेत आहे. त्याबाबतही तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आंबोली परिसरात मान्सून पर्यटन सुरु होणार असून पाऊस व धुके यामुळे मोठया प्रमाणात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली आहे










