LIVE UPDATES

पत्रकार संदीप देसाई यांच्या कुटुंबीयांचं आमदार दीपक केसरकर यांनी केले सांत्वन

Edited by: लवू परब
Published on: June 13, 2026 21:21 PM
views 25  views

दोडामार्ग : राज्याचे माजी मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार व हेवाळे गावचे माजी सरपंच संदीप देसाई यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. संदीप देसाई यांचे वडील आणि हेवाळे गावचे प्रतिष्ठित नागरिक अमृत देसाई यांचे मंगळवारी (दि. ९) दुःखद निधन झाले होते. त्यानंतर शुक्रवारी आमदार केसरकर यांनी हेवाळे-बाबरवाडी येथील संदीप देसाई यांच्या निवासस्थानी भेट देत देसाई व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि या दुःखद प्रसंगी त्यांना धीर दिला.

यावेळी शिवसेना जिल्हा उपसंघटक गोपाळ गवस उपस्थित होते. तसेच शिवसेना तालुकाप्रमुख तथा दोडामार्ग पंचायत समितीचे उपसभापती गणेशप्रसाद गवस, भाजप तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस, उबाठा शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, प.पू. राऊळ महाराज ट्रस्ट, पिंगुळीचे कार्याध्यक्ष विठोबा राऊळ तसेच ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनीही संदीप देसाई यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देऊन देसाई कुटुंबीयांना धीर दिला.