LIVE UPDATES

४२० वरून थेट २९ हजार ५४० रूपयांच बील

७० टक्के वाढीव बीलाने चक्रावले वीज ग्राहक
Edited by: विनायाक गांवस
Published on: June 13, 2026 18:47 PM
views 613  views

सावंतवाडी : एकीकडे रेग्युलर मीटर काढून स्मार्ट मीटर बसविल्यानंतर येणारी भरमसाठ बील ऐकिवात आहेत. मात्र, आता स्मार्ट मीटरच कनेक्शन असणाऱ्या एका घरात दुप्पट, तिप्पट नाही तर हजारांत बील येण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी महावितरण कार्यालयात शनिवारी ते गेले असता संबंधित अधिकारी सुट्टीवर असल्याचे तसेच कार्यालय बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आल्याचे वीज ग्राहकांनी सांगितले. 

डिसेंबर महिन्यात शहराशेजारील गावात हा स्मार्ट मीटर बसविण्यात आला होता. यावेळी २८४० रूपये पहिलं बील त्यांना आले. तदनंतर जानेवारी ६०० रू.,‌ फेब्रुवारी १ हजार १७०, मार्च ८२० रू., एप्रिल २६० तर मे महिन्यात ४२० रुपये बील आलेलं असताना जून महिन्यात हजारोंच्या पटीत हे बील आले.  जून महिन्यात तब्बल २९ हजार ५४० रूपये बील आल्याने हे वीज ग्राहक चक्राऊन गेलेत. महावितरण कार्यालयात ते गेले असता संबंधित अधिकारी सुट्टीवर असल्याचे तसेच शनिवार असल्याने कार्यालय बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वाढीव बीलाच करायचं काय ? असा सवाल त्यांच्यासमोर उपस्थित राहिला आहे.

दरम्यान, याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी कार्यालयास भेट दिली असता संबंधित अधिकारी सुट्टीवर असल्याचे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच शनिवार, रविवार असल्याने कार्यालय बंद असल्याचे सांगण्यात आले. एकीकडे, जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसविण्यात येत असताना ग्राहकांचा विरोध होत आहे. यातच आता स्मार्ट मीटरच कनेक्शन असणाऱ्या ग्राहकांना देखील येणारी बील बघता महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत‌‌.