LIVE UPDATES

यंदा कणकवली पर्यटन महोत्सव मोठ्या उत्साहात होणार

महोत्सवाच्या नियोजनासाठी २४ नोव्हेंबरला सहविचार सभा; नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे सांस्कृतिक संस्था व कलावंतांना उपस्थित राहण्याचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 21, 2026 08:15 PM
views 344  views

कणकवली : कणकवली शहराच्या सांस्कृतिक आणि पर्यटन वैभवात भर घालणारा कणकवली पर्यटन महोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्याच्या दृष्टीने नगरपंचायतीने तयारी सुरू केली आहे. खाद्य संस्कृतीची विशेष मेजवानी, लहान मुलांसाठी आकर्षक आकाशपाळणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल अशा विविध उपक्रमांनी यंदाचा पर्यटन महोत्सव रंगणार आहे.

या महोत्सवाचे नियोजन अधिक प्रभावी आणि भव्य स्वरूपात करण्यासाठी कणकवली नगरपंचायतीच्या वतीने सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता कणकवली नगरपंचायत येथे ही सभा पार पडणार आहे. यावेळी पर्यटन महोत्सवाची दिनांक व कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात येणार आहे.

या सभेला सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्थानिक संस्था, त्यांचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील कलावंतांना निमंत्रित करण्यात आले आहे. महोत्सवात कोणते सांस्कृतिक कार्यक्रम असावेत, स्थानिक कलावंतांना कोणत्या संधी उपलब्ध करून देता येतील, तसेच खाद्य संस्कृती आणि मनोरंजनाच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कोणते उपक्रम राबवावेत, याबाबत या सभेत चर्चा होणार आहे.

कणकवली पर्यटन महोत्सव हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम न राहता स्थानिक कला, संस्कृती, खाद्यपरंपरा आणि पर्यटनाला चालना देणारे व्यासपीठ ठरावे, या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व संस्था, पदाधिकारी आणि कलावंत यांनी २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सहविचार सभेला वेळेवर उपस्थित राहून आपले बहुमोल विचार व सूचना मांडाव्यात आणि महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले आहे.


ताजी बातमी

View all

Lutru Mahadev Temple in Solan Himachal Pradesh where devotees offer lit cigarettes to Lord Shiva
Lutru Mahadev Temple : देवाला चक्क दारू आणि सिगारेटचा नैवेद्य?
November 21, 2026
Omkar Elephant : सावंतवाडी, वेंगुर्ल्यात धुमाकूळ घातल्यानंतर ओंकार हत्ती पुन्हा दोडामार्गात
November 21, 2026
Jijau Organization distributes free notebooks to school students in Dodamarg Sindhudurg under Nilesh Sambare's initiative.
कोकणातून अधिकारी घडवणे हेच ध्येय असून शेवटच्या श्वासापर्यंत कोकणासाठी काम करणार
November 21, 2026
Konkan Railway trains delayed at Sawantwadi railway station due to operational disruptions
Konkan Railway Delay : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
November 21, 2026
संबंधित बातम्या

View all

Omkar Elephant : सावंतवाडी, वेंगुर्ल्यात धुमाकूळ घातल्यानंतर ओंकार हत्ती पुन्हा दोडामार्गात
November 21, 2026
Jijau Organization distributes free notebooks to school students in Dodamarg Sindhudurg under Nilesh Sambare's initiative.
कोकणातून अधिकारी घडवणे हेच ध्येय असून शेवटच्या श्वासापर्यंत कोकणासाठी काम करणार
November 21, 2026
Konkan Railway trains delayed at Sawantwadi railway station due to operational disruptions
Konkan Railway Delay : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
November 21, 2026
MSRTC Kolhapur-Dodamarg bus found on highway after breaking bus stand compound wall
Dodamarg News : रात्री बसस्थानकात पार्क केलेली एसटी सकाळी महामार्गावर
November 21, 2026