LIVE UPDATES

आईच्या स्मृतीतून समाजसेवेचा आदर्श

मातोंड इथं विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 22, 2026 16:23 PM
views 46  views

वेंगुर्ले : मातोंड-नाटेलीवाडी येथील श्री देव खरोबा विद्या मंदिर शाळेत शिक्षणाला प्रोत्साहन देणारा आणि समाजापुढे आदर्श निर्माण करणारा उपक्रम उत्साहात पार पडला. श्री देव खरोबा मित्रमंडळ, मातोंड-नाटेलीवाडी आणि माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना वह्या व दफ्तरांचे वितरण करण्यात आले.

मंडळाचे कार्यकर्ते सुहास रामदास बागायतकर यांनी आपल्या आई कै. सत्यवती रामदास बागायतकर आणि वडील कै. रामदास बागायतकर यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना वह्यांचे तसेच दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दफ्तरांचे वाटप केले. तसेच २००४-०५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे वर्गमित्र कै. सुनील मसुरकर यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना दफ्तरांचे वितरण करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

या कार्यक्रमाला तुळस जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ, मातोंड ग्रामपंचायत सरपंच मयुरी वडाचेपाटकर,  निवृत्त शिक्षिका देवयानी आजगावकर, ग्रामपंचायत सदस्य विशाल बागायतकर, माजी ग्रामपंचायत सदस्य सिताराम जाधव, शिक्षक श्री दयाळ, अंगणवाडी सेविका, शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच श्री देव खरोबा मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात माजी शिक्षिका देवयानी आजगावकर यांच्या दीर्घ शैक्षणिक सेवेला गौरव देत त्यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान अनमोल असल्याचे नमूद केले.

यावेळी मुख्याध्यापक समीर तेंडोलकर (पेंढर्याची वाडी शाळा), शिक्षक सोमनाथ पवार (मिरीस्तेवाडी शाळा) यांच्यासह सत्यवान वैद्य, मंगेश जबडे, आनंद जबडे, उदय वाटवे, जयराम केणी, दशरथ केणी, निलेश केणी, प्रशांत जबडे, श्याम नाईक, प्रसाद जबडे, गुरुनाथ नाईक, नंदकिशोर जबडे, सुनिल जबडे, संदेश कोरगावकर, चंद्रशेखर मांजरेकर, गोविंद नाईक, कृष्णा नाईक, गुरुनाथ वैद्य, प्रकाश जबडे, प्रियांका वैद्य, नारायण मयेकर, विजय कोरगावकर, सुविधा वाडयेकर, पल्लवी आरमारकर, पूजा वाडयेकर, शारदा जबडे, नारायण केणी, ओंकार कोरगावकर, प्रसाद नाईक, साहिल नाईक, निषाद केणी आदी कार्यकर्ते व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद नाईक यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक संजय गुच्छलवार यांनी केले.


फोटो