LIVE UPDATES

केरवडे कर्याद नारूर शाळेत दिवाळीनिमित्त कलात्मक उपक्रम

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 09, 2026 06:52 PM
views 43  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

कुडाळ: दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि प्रकाशाचा सण... या सणाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने जि. प. पू. प्रा. शाळा, केरवडे कर्याद नारूर नं. १ येथे विविध कलात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मॅट रांगोळी साकारण्याचे मार्गदर्शन शिक्षिका श्रीमती दीपा परब मॅडम यांनी केले. तर आकर्षक ग्रीटिंग कार्ड आणि आकाशकंदील निर्मितीचे मार्गदर्शन श्रीमती स्मिता शिंदे मॅडम यांनी केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा आणि कलात्मक कौशल्याचा सुंदर आविष्कार घडवत विविध आकर्षक कलाकृती साकारल्या. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सर्जनशीलतेला चालना मिळाली, तसेच पारंपरिक सणांमधील कलात्मकतेचा आनंदही त्यांना अनुभवता आला.या उपक्रमांची संकल्पना आणि प्रेरणा शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. प्रकाश कडव सर यांची लाभली.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शाळेने राबविलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून जि. प. पू. प्रा. शाळा, केरवडे कर्याद नारूर नं. १ येथील सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.