LIVE UPDATES

सेवा संकल्प अभियानातून देवगड पंचायत समितीत महारक्तदान शिबिर

२ ऑक्टोबरला आयोजन | अधिकाधिक रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 27, 2026 15:01 PM
views 29  views

देवगड : सेवा संकल्प अभियानांतर्गत पंचायत समिती देवगडच्या वतीने शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता पंचायत समिती देवगड सभागृहात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी रक्तदात्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. सामाजिक बांधिलकी जपत सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून या महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात अधिकाधिक रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदानाचे पवित्र कार्य करावे, असे आवाहन पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके आणि गटविकास अधिकारी निलेश जगताप यांनी केले आहे.