
सावंतवाडी : तालुक्यातील महिला वनरक्षकाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माडखोल येथील राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवले. या घटनेचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.
आश्लेषा मांगले (वय २२, मूळ रा. कोल्हापूर) असं त्यांचे नाव असून आंबोली विभागात महिला वनरक्षक म्हणून त्या कार्यरत होत्या. आज त्यांनी माडखोल येथील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आत्महत्येच कारण अद्याप समजू शकलेले नसून पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील सोपस्कारासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे आणण्यात आला आहे.










