LIVE UPDATES

रक्तदान शिबीरात तब्बल ५४ रक्तदात्यांनी केलं रक्तदान

Edited by: स्वप्नील लोके
Published on: June 15, 2026 20:01 PM
views 9  views

देवगड : जागतिक रक्तदान दिन आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदूर्ग वर्धापन दिनानिमित्त युवा विकास प्रतिष्ठान जामसंडे आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा देवगड यांच्यावतीने जामसंडे हायस्कूल येथे आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबीरात ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

जामसंडे हायस्कूल येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन पोलिस निरिक्षक श्याम बुवा यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष हिराचंद तानवडे, सचिव प्रकाश जाधव, युवा विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंकूश उर्फ बाबू लाड, सचिव सुधीर तांबे, सिंधुरत्न मित्र जिल्हा सदस्य विजयकुमार जोशी, जिल्हा सल्लागार उध्दव गोरे, डॉ.भारती ठोंबरे, जनसंपर्क अधिकारी नितीन तुरणार, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक प्रविण सावंत आदी उपस्थित होते. यावेळी ४२ वेळा रक्तदान केलेले रक्तदाते योगेश जाधव यांना सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैभव वारीक तर आभार प्रकाश जाधव यांनी मानले.