LIVE UPDATES

रिक्तपदांबाबत आरोग्यमंत्र्यांच वेधलं केसरकरांनी लक्ष

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 26, 2026 15:31 PM
views 54  views

सावंतवाडी : माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन मतदार संघातील आरोग्य विषयकबाबींवर चर्चा केली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व इतर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरण्यासंदर्भात आग्रही मागणी त्यांनी केली. 

तसेच उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे डायलिसिस यंत्रणा उपलब्ध करून देण्याबाबत आग्रही मागणी केली. मंत्री प्रकाश आबिटकर यांनी रिक्त सर्व पदे लवकरात लवकर भरण्यात येतील व डायलिसिस यंत्रणा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच उपजिल्हा रुग्णालय जागेचा प्रश्न आता मिटला असून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बांधकाम लवकरात लवकर होण्यासाठी पुढील आवश्यक ती कार्यवाही विभागाकडून लवकरात लवकर होण्बाबतची विनंती श्री. केसरकर यांनी केली. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सिंधुदुर्ग सचिन वालावलकर उपस्थित होते.