LIVE UPDATES

तारामुंबरी बीचवर आढळला मृत डॉल्फिन

वन विभागाकडून नियमानुसार दफन ; सुमारे ८ फूट लांबीचा डॉल्फिन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 15, 2026 10:28 AM
views 23  views
#kokansadlive#news update#konkan update#devgad#beach#dead dolphin

देवगड : तारामुंबरी समुद्रकिनारी सोमवारी (१४ सप्टेंबर) सुमारे आठ फूट लांबीचा मृत डॉल्फिन आढळून आला. मत्स्यव्यवसाय विभागाचे सुरक्षा रक्षक अभिषेक कोयंडे हे नियमित कर्तव्यावर असताना तारामुंबरी बीचवर त्यांना हा मृत डॉल्फिन आढळला.

या घटनेची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी वाघमारे यांना देण्यात आली. त्यांनी पुढील कार्यवाहीसाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळविले.

माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून नियमानुसार आवश्यक कार्यवाही व पूर्तता केली. त्यानंतर मृत डॉल्फिनला तारामुंबरी समुद्रकिनारीच नियमानुसार पुरण्यात आले.दरम्यान, या घटनेबाबत स्थानिक प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही केल्याचे समजते.