
रायगड : रायगडच्या पुगाव येथे पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास धोकादायक रसायनाची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात झाला.जेएनपीटीहून महाडच्या दिशेने जाणाऱ्या या कंटेनरमध्ये 2-Methyl-2-propanol अर्थात tert-Butanol हे अत्यंत ज्वलनशील रसायन होते.
अपघातानंतर कंटेनरच्या मॅनहोलमधून रसायनाची गळती होत असल्याचे समोर आले.घटनेची माहिती मिळताच SVRSS, येरुणकर क्रेन सर्विस, महामार्ग पोलीस आणि कोलाड पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.
धोका लक्षात घेऊन गळती तातडीने नियंत्रित करण्यात आली. सुरक्षेसाठी ‘NO MOBILE ZONE’ लागू करण्यात आला, तर खांब ते कोलाड दरम्यानची वाहतूक सुमारे एक तास थांबवण्यात आली.सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी आग, स्फोट आणि जीवितहानी टळली.










