
दापोली : 'एल निनो'च्या प्रभावामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे येणाऱ्या काळात वॉटर लॉकडाऊन लागण्याची भीती व्यक्त करतानाच; सावध पुढल्या हाका या तत्त्वानुसार पाण्याच्या बचतीचे आणि येणाऱ्या संकटात ठामपणे उभे राहण्याचे अनेक उपाय आहेत. त्याची अमलबजावणी करा, असे आवाहन निवेदिता प्रतिष्ठान, दापोलीचे अध्यक्ष आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉ. प्रशांत परांजपे यांनी केले.
दुष्काळ स्थिती आणि त्याचे संभाव्य परिणाम या गंभीर विषयावर जनजागृती व मार्गदर्शनासाठी डॉ. बाळसाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयात "जलसंवाद" या विशेष कार्यक्रमात डॉ. परांजपे बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुष्पा पाटील , सहाय्यक नियंत्रक अपर्णा पित्रे, निवेदिता प्रतिष्ठानच्या महेश्वरी विचारे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी महाविद्यालयांतर्गत असलेले सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदवीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्याच्या हवामानातील बदलांमुळे उद्भवणाऱ्या जलसंकटावर मात करण्यासाठी आणि योग्य उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी हा "जलसंवाद" कार्यक्रम अत्यंत मोलाचा ठरला आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








