LIVE UPDATES

कणकवली शहराचा नव्याने सिटी सर्व्हे करा

नगरसेवक गणेश उर्फ बंडू हर्णे यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे निवेदनाद्वारे मागणी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 03, 2026 19:05 PM
views 42  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

कणकवली:कणकवली शहराचा सिटी सर्व्हे गावचा सी.टी सर्व्हे १९८५ साली करण्यात आला असून उर्वरीत शहराचा सी.टी सर्वे अदयाप करण्यात आलेला नाही. सन १९८५ मध्ये भागशः झालेल्या सी.टी  सर्व्हेमध्ये अनेक हिस्से एकत्र करुन त्यांचा एक न.भु क्रमांक (मिळकत पत्रिका ) करण्यात आली असल्याने व्यक्तीशः जमिन मालकाला आपल्या जमिनीची मोजणी न.भु. मध्ये सामाविष्ट असलेल्या इतर जमिन मालकांच्या संमत्तीखेरीज आपली स्वतःची जामिन मोजता येत नाही. या मुद्द्याबाबत कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक गणेश उर्फ बंडू हर्णे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, आपल्या जमिनीचा हद्द ठराव मोजणीसुद्धा करुन घेता येत नाही. त्याचबरोबर सन १९८५ मध्ये सी.टी सर्वे मोजणी होताना व मिळकत पत्रीका बनताना सामाईक जमिनीमध्ये उपस्थित असलेल्या एकाच व्यक्तीचे नाव मिळकत पत्रिकेमध्ये दाखल असल्याने फक्त मिळकत पत्रिका धारकांच्या वारसांना वारस म्हणून नावे लागली जात असून इतर हिस्सेदारांची नावे सदर मिळकतीत नोंद होत नाहीत. सदर या सर्व बाबतीमुळे कणकवली शहरातील प्रत्येक मिळकतधारकाचे सहहिस्सेदार हे आपल्या जमिनीच्या सामाईक मालकीच्या हक्कापासून वंचित राहत आहेत. तरी सदर कणकवली शहराचा सी.टी सर्वे हा दोषमुक्त होऊन संपुर्ण शहराचा सी.टी सर्व्हे नव्याने करण्यात यावा. व शहरवासियांवर होणारा अन्याय टाळावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.