LIVE UPDATES

पंचायत समिती वेंगुर्ला येथे स्वच्छता अभियान उत्साहात

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 11, 2026 18:05 PM
views 42  views
#kokansadlive#news update#konkan update#

वेंगुर्ला : पंचायत समिती वेंगुर्ला कार्यालय परिसरात दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. स्वच्छ, सुंदर व निरोगी कार्यालयीन परिसर निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमांतर्गत कार्यालयाच्या आवारातील परिसराची स्वच्छता करण्यात आली.

 या स्वच्छता अभियानास पंचायत समिती वेंगुर्लाचे सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, कक्ष अधिकारी संदीप मांजरेकर यांच्यासह पंचायत समितीतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालय परिसरातील कचरा, प्लास्टिक व इतर अनावश्यक वस्तूंची विल्हेवाट लावत परिसर स्वच्छ केला. स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम न राहता ती नियमित सवय बनविण्याची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी अधोरेखित केले.

स्वच्छ व सुंदर कार्यालय परिसर राखण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी पार पाडावी, तसेच नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत जनजागृती करावी, असा संदेश या अभियानातून देण्यात आला.

पंचायत समितीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे स्वच्छता अभियान उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.