LIVE UPDATES

१९ वर्षाखालील तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूलला यश

१० वीतील कु. वसंत गवस याने पटकावला द्वितीय क्रमांक
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 09, 2026 19:23 PM
views 15  views

सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा नाबर इंग्लिश स्कूल, बांदा येथे सोमवारी संपन्न झालेल्या शालेय तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत १९ वर्षाखालील विद्यार्थी गटात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या इ. १० वीतील कु. वसंत संदिप गवस याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे .

कु. वसंत गवस जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी सावंतवाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. कु. वसंत याला प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका मारिया आल्मेडा तसेच त्याच्या पालकांनीही मार्गदर्शन केले. सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक-शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी यांनी वसंत गवस याचे अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .