LIVE UPDATES

भाडेतत्त्वावर जागा घेऊन उद्योगाची संधी

शासनामार्फत विविध योजना
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 06, 2026 14:03 PM
views 33  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. उद्योगासाठी भाडेतत्त्वावर जागा घेऊन व्यवसाय करणाऱ्या पात्र उद्योजकांना Rental Subsidy / Factory Rental Subsidy अंतर्गत भाड्याच्या 30% पर्यंत अनुदान मिळण्याची संधी उपलब्ध आहे.

जिल्ह्यातील काजू प्रक्रिया, अन्नप्रक्रिया, मसाला निर्मिती, कोकम प्रक्रिया, पॅकेजिंग, हस्तकला, अगरबत्ती निर्मिती तसेच इतर उत्पादन क्षेत्रातील पात्र उद्योगांनी या योजनेची माहिती घेऊन लाभासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. या योजनेअंतर्गत पात्रता, 30% भाडे अनुदान, आवश्यक कागदपत्रे, भाडेकरार, उद्योग नोंदणी तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन BFC कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील पात्र उद्योजकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या उद्योगाच्या विकासाला चालना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.