
दोडामार्ग : साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मंगळवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकूण 25 रक्तदात्यांनी सहभाग दर्शविला. या शिबिराचे उद्घाटन जि. प. सदस्य तथा जनआरोग्य समिती साटेली भेडशी अध्यक्ष श्वेता धर्णे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जि. प. सदस्य दीपक गवस, पं.स. सदस्य संजय सातार्डेकर, स्नेहा गवस, साटेली भेडशी सरपंच छाया धर्णे, उपसरपंच चंद्रकांत मयेकर,जिल्हा भाजपा चिटणीस सुधीर दळवी,केर माजी सरपंच प्रेमानंद देसाई,सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस,माजी उपसरपंच सूर्यकांत धर्णे,गणपत डांगी महेश लोंढे, राकेश धर्णे,वैभव सुतार, झरेबांबर सरपंच अनिल शेटकर, आयनोडे सरपंच श्रुती देसाई,कोनाळकट्टा उपसरपंच रत्नकांत कर्पे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश सरूळकर ,वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील,डॉ. देसाई, आरोग्य सेवक प्रमोद तळणकर,रक्त विघटक केंद्र उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीचे अधिकारी कर्मचारी वर्ग आणि रक्तदाते उपस्थित होते.
आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी, जन आरोग्य समिती साटेलीभेडशी आणि रक्त विघटक केंद्र उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरासाठी एकूण 60 इच्छुक रक्तदाते आले होते त्यांच्या प्राथमिक तपासणीअंती एकूण 25 रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान शिबिर यशस्वी केले या सर्व रक्तदात्यांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी अभिनंदन केले तसेच अशाच प्रकारे जास्तीत जास्त रक्तदात्यांनी बहुमूल्य रक्तदान करून लोकांचे प्राण वाचवावेत असे आवाहन केले.











