LIVE UPDATES

लायन्स क्लब मालवणचा आदर्शवत सामाजिक उपक्रम

गोमाते साठी पौष्टिक खाद्य शेतकऱ्यांना सुपूर्द ; शेतकऱ्यांना पावसाळी खोळ वितरण ; लायन्स क्लब अध्यक्ष सहदेव बापर्डेकर व पदाधिकारी उपस्थित
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 08, 2026 20:03 PM
views 39  views

मालवण : लायन्स क्लब मालवणच्यावतीने आदर्शवत असा विशेष सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. नूतन अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतकऱ्यांच्या भेटी घेत त्यांना पावसाळी खोळ शेतीसाठी उपयुक्त साहित्याचे वितरण करण्यात आले. या सोबतच गोमातेसाठी पौष्टिक खाद्य शेतकऱ्यांना सुपूर्द करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत, क्लबचे पदाधिकारी यांनी मालवण शहरातील साईमंदिर मागील धुरीवाडा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. 

पावसाळी कालावधीत शेतकऱ्यांसाठी आवश्यक्ष पावसाळी खोळ शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. तसेच गोमातेला खाद्य देण्यात आले. यावेळी लायन्स क्लब नूतन अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोंडकर, वैशाली शंकरदास, जयश्री हडकर, फॅनी फर्नांडिस, उमेश शिरोडकर, विनोद शंकरदास यांसह शेतकरी राजन आंबेरकर, निक्सन फर्नांडिस, पुजा माळकर, रवीना आंबेरकर, रेश्मा गांवकर, सीमा बुटे, येलोत्रीन फर्नांडिस यांसह अन्य शेतकरी उपस्थित होते.