LIVE UPDATES

अक्कलकोट देवस्थानतर्फे वेंगुर्ला न.प.च्या नगरसेविका समिधा रेडकर यांचा सत्कार

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 08, 2026 19:48 PM
views 43  views

वेंगुर्ला : अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी उपस्थित राहिलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नगरसेविका समिधा रेडकर यांचा अक्कलकोट देवस्थानच्यावतीने अध्यक्ष तथा स्वामीसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर नगरसेविका समिधा रेडकर यांनीही अध्यक्ष महेश इंगळे यांचा सत्कार केला. अक्कलकोट देवस्थानच्या कार्यालयात झालेल्या या सत्कार समारंभाप्रसंगी नगरसेविका समिधा रेडकर, रोहित रेडकर आणि योगेश वारंग उपस्थित होते. दररोज हजारो स्वामी भक्त अक्कलकोटी येत असतात. त्यांचे सेवा करण्याचे काम महेश इंगळे हे अगदी तत्परतेने करतात. त्यांच्या या कार्यातून आम्हालाही प्रेरणा मिळते. वेंगुर्ला न.प.च्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे समिधा रेडकर यांनी सांगितले. तर स्वामी सेवक योगेश वारंग यांनी अक्कलकोट येथे भजन सेवा करण्याची संधी मिळावी अशी इच्छा महेश इंगळे यांच्याकडे व्यक्त केली.

वेंगुर्ला हे कोकणातील निसर्ग सुंदर पर्यटनस्थळ आहे. एवढेच नव्हे तर अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांच्या आत्मपादुकाही त्याठिकाणी आहेत.  त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद सर्वांसोबतच वेंगुर्लावासीयांवरसुद्धा आहे. येथील नगरसेवकांनी जनतेच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहन महेश इंगळे यांनी केले. यावेळी अक्कलकोट देवस्थानचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच वेंगुर्ला येथील स्वामीभक्त उपस्थित होते.