LIVE UPDATES

निलेश राणेंना मंत्रीपद मिळावे म्हणून दैवज्ञ गणपती मंदिरात अभिषेक

गुरू मठकरांकडून चांदीची मूर्ती भेट
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 01, 2026 18:00 PM
views 45  views

सावंतवाडी : अंगारकी संकष्टी निमित्त कुडाळ-मालवण चे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांना मंत्रीपद मिळूदेत म्हणून माजी नगरसेवक गुरू मठकर यांनी दैवज्ञ मंदिरात अभिषेक केला. तसेच निलेश राणेंची भेट घेत त्यांना चांदीची मुर्ती भेट दिली. 

दैवज्ञ गणपती मंदिरामध्ये चांदीच्या गणेश मूर्तीवर त्यांना मंत्रीपद मिळावे म्हणून अभिषेक करण्यात आला. त्यांच्यासह राणे कुटुंबीयांना दीर्घायुष्य लाभो व उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना केली. तसेच पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे, दीपक केसरकर यांना दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करायचीय शक्ती मिळूदे असं साकडं त्यांनी गणेशाला घातलं.