LIVE UPDATES

अभिनव फाउंडेशनच्या दीपोत्सवानिमित्त भव्य रील स्पर्धा

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 07, 2026 05:38 PM
views 45  views

सावंतवाडी : अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्ग यांनी दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून मंगळवार १० नोव्हेंबर रोजी दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर श्रीमंत शिवरामराजे पुतळ्यानजीक हा सोहळा संपन्न होणार असून मोतीतलाव हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघणार आहे. तसेच सेल्फी पॉईंट ही उभारण्यात येणार आहेत. 

यानिमित्त भव्य रील स्पर्धेचे आयोजन ही करण्यात आले असून स्पर्धकांनी या दीपोत्सवाची रील बनवून ती अभिनव फाउंडेशन च्या इन्स्टा अकाउंट ला टॅग करायची आहे. या स्पर्धेचे नियम अभिनव च्या AbhinavfoundationSindhudurga या फेसबुक आणि abhi. navfoundation या इन्स्टा अकाउंट ला उपलब्ध आहेत. 

या स्पर्धेसाठी वीर सावरकर पतसंस्था, सावंतवाडी यांनी प्रायोजित केलेली बक्षिसे प्रथम क्रमांक रु ३००१, द्वितीय रु २००१, आणि तृतीय रु १००१ अशी असून सन्मानचिन्हे ही विजेत्यांना प्रदान करण्यात येणार आहेत. इच्छुक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे तसेच सर्व नागरिकांनी या दीपोत्सवात सहभागी होऊन हजारो दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघणारा मोती तलाव याची देही याची डोळा पाहण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन अभिनव फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

Eco-friendly Diwali Akash Kandil made from natural areca nut tree sheaths by Sunil Mulik from Dhakore village in Sindhudurg.
Eco-Friendly Diwali Lantern : ‘सुपारी’चे झाड...उचलला ‘कलात्‍मकतेचा विडा’
November 07, 2026
Sawantwadi police recover 12 tola stolen gold jewellery from Karnataka in a gold theft case involving an accused husband-wife duo.
Sawantwadi Gold Theft Case : सावंतवाडीत १२ तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघड
November 07, 2026
कबड्डीपटूंची निवड गुणवत्तेच्या आधारेच होणार : ॲड. अजित गोगटे
November 07, 2026
MSRTC Ratnagiri Division announces 26 additional daily bus services for passengers during the Diwali festival.
Ratnagiri Diwali Special ST Buses : दिवाळीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून २६ जादा फेऱ्या
November 07, 2026
संबंधित बातम्या

View all

Eco-friendly Diwali Akash Kandil made from natural areca nut tree sheaths by Sunil Mulik from Dhakore village in Sindhudurg.
Eco-Friendly Diwali Lantern : ‘सुपारी’चे झाड...उचलला ‘कलात्‍मकतेचा विडा’
November 07, 2026
MSRTC Ratnagiri Division announces 26 additional daily bus services for passengers during the Diwali festival.
Ratnagiri Diwali Special ST Buses : दिवाळीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून २६ जादा फेऱ्या
November 07, 2026
Uday Samant Announces Diwali Relief for Ratnagiri Farmers
Ratnagiri News : दुष्काळग्रस्त प्रत्येक बाधित शेतकऱ्याला मिळणार पूर्ण न्याय : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
November 07, 2026
कणकवली शहरात आज नरकासुर स्पर्धेचा उत्साह
November 07, 2026