
कणकवली : शहरात नरकासुर स्पर्धेचा उत्साह पाहायला मिळत आहे. कांबळी गल्ली मित्र मंडळाच्या वतीने युवकांनी आकर्षक असा नरकासुर बनवला असून आज कणकवलीत नरकासुर स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून कोकणातील पारंपरिक कला, संस्कृती आणि उत्साहाला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वैभव मालंडकर मित्रमंडळ व टेंबवाडी मित्रमंडळ, कणकवली यांच्या वतीने यंदाही भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायकाळी गणपतीसाना रोड, श्री देवी चौडेश्वरी मंदिर चौक, कणकवली येथे नरकासुर स्पर्धेचा जल्लोष रंगणार आहे.
या स्पर्धेसाठी विजेत्यांवर आकर्षक रोख पारितोषिकांची बरसात होणार आहे. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मंडळाला १५ हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकासाठी १० हजार रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत कोणते मंडळ बाजी मारणार, याची उत्सुकता आतापासूनच लागून राहिली आहे








