LIVE UPDATES

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आहना पालव द्वितीय

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 29, 2026 15:52 PM
views 23  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सिंधुदुर्ग : कुडाळ क.म‌.शि.प्र मंडळाच्या इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलची विद्यार्थिनी आहना पालव हिने उत्तम कामगिरी करीत जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. तिची सांगली येथे होणाऱ्या विभागीयस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

कणकवली येथील समर्थ मंगल कार्यालयात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मुख्याध्यापिका मुमताज शेख यांनी पुष्पगुच्छ देऊन आहनाचे अभिनंदन केले. तिच्या या यशाबद्दल सिंधुदुर्गच्या जिल्हा क्रीडा अधिकारी शितल शिंदे यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच प्रशालेतील सर्व शिक्षकांनीही आहनाचे अभिनंदन केले. प्रशालेचे शिक्षक प्राजक्त चव्हाण, तसेच मुक्ताई अकॅडमीचे कौस्तुभ पेडणेकर आणि बाळकृष्ण पेडणेकर यांचेही मार्गदर्शन लाभले. आहनाच्या या यशाबद्दल शाळा परिसरातून तिचे कौतुक होत आहे.