
वेंगुर्ला: पाल ग्रामपंचायतच्या वतीने गावात जलसंवर्धनासाठी महत्वाचे पाऊल टाकण्यात आले असुन आतापर्यंत गावातील ग्रामस्थ, महिला बचत गट यांच्या सहकार्याने १० वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. आज गावातील काही मुख्य ठिकाणी वेंगुर्ला पं स सभापती शंकर घारे, तहसिलदार ओंकार ओतरी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, जि.प. सदस्य सुजता पडवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बंधारे घालण्यात आले.
सर्वप्रथम पाल गावची ग्रामदेवता मूळ भूमिका देवीला श्रीफळ ठेऊन आगामी तालुक्यात होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले. यावेळी याच श्री देवी भूमिका मंदिर शेजारी असलेला मुख्य बंधारा, मिरखोलवाडीतील बंधारा व श्री झेंडोबा मंदिर नजिकचा बंधारा घालण्यात आला. तसेच गावातील जलतारा खड्ड्याची पाहणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. ग्रामपंचायतने जलसंवर्धनासाठी केलेल्या या कामाचेही अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले. यावेळी सरपंच कावेरी गावडे, उपसरपंच प्रीती गावडे, पाल सोसायटी चेअरमन कमलेश गावडे , पंचायत अधिकारी अमर गाडेकर, ग्रा.प. सदस्य
प्रदीप मुळीक, श्रीकांत गावडे, विनिता गावडे, श्यामल केरकर, स्नेहल पालकर, सीआरपी संपदा पिंगुळकर, सुचिता नाईक, पोलीस पाटील ऋतिका नाईक, आशा सेविका राजश्री पालकर, तंटामुक्ति अध्यक्ष विलास गावडे, माजी सरपंच राजाराम गावडे, ग्रामस्थ संदीप नाईक, रमेश आमडोस्कर, योगेश कोळसूलकर, कर्मचारी सत्यविजय गावडे, नीलिमा गावडे, मनोहर गावडे, द्वारकानाथ गावडे, वरद गोडबोले, महिला बचत गट, कल्पतरू ग्रामसंघ, आशासेविका, मदतनीस व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












