LIVE UPDATES

Omkar Elephant : ओंकार हत्तीला नेमळेतून त्वरित हटवा, अन्यथा फटाके फोडून हुसकावणार

आंबा बागायतदारांचा वनविभागाला इशारा; हत्तीला पुन्हा कळपात जाण्यास प्रवृत्त केले जाईल - उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांचे आश्वासन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 17, 2026 04:17 PM
views 68  views
Onkar elephant in Nemale village of Sawantwadi as mango farmers raise concerns over crop damage and safety with the Sindhudurg Forest Department.

सावंतवाडी : ओंकार हत्तीला नेमळे आणि परिसरातून त्वरित बाहेर काढा. अन्यथा, फटाके उडवून त्याला हुसकावून लावू, असा इशारा नेमळे गावातील आंबा बागायतदारांनी आणि लोकप्रतिनिधींनी वनविभागाला दिला आहे. यावर उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी उपस्थितांना आवाहन करत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हत्ती आक्रमक होऊ शकतो आणि तो उधळल्यास मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे असा कोणताही प्रकार करू नका, हत्तीला पुन्हा कळपात जाण्यास प्रवृत्त केले जाईल असे आश्वासन दिले.

नेमळे परिसरातील आंबा बागायतदारांनी उपवनसंरक्षक कार्यालयात जाऊन मिलिश शर्मा यांची भेट घेतली. हत्तीच्या वाढत्या उपद्रवाबाबत तीव्र संताप व्यक्त केला. सध्या आंब्याचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी मशागतीसाठी बागांमध्ये जात आहेत.

हत्तीमुळे बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. झाडांचे नुकसान झाल्यास वनविभाग एकदाच भरपाई देईल. पण, वर्षानुवर्षे उत्पन्न देणारे झाड नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे भरून न येणारे नुकसान होईल, असा मुद्दा ठाकरे शिवसेना मतदारसंघ प्रमुख रूपेश राऊळ यांनी मांडला. 

तसेच कुडाळच्या दिशेने गेलेल्या हत्तीला पुन्हा नेमळे गावात का आणले ? असा सवाल पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक यांनी केला. तर एका वन अधिकाऱ्याने ग्रामस्थांशी उद्धट वर्तन केल्याचा व्हिडिओ दाखवून त्याच्यावर कारवाईची मागणीही करण्यात आली. यावेळी उपवनसंरक्षक मिलिश शर्मा म्हणाले, ओंकार हत्ती तरुण असून तो गेली तीन वर्षे आपल्या कळपापासून दूर आहे. तालुक्यात तो स्थिरावला असून हा परिसर त्याला सुरक्षित वाटला आहे. मात्र, हत्तीला हुसकाऊन लावण्यासाठी

फटाके वाजवल्यास तो घाबरून आक्रमक होईल. अशावेळी तो कोणत्या दिशेला जाईल हे सांगणे कठीण होईल. ग्रामस्थांना सुरक्षतेच्या दृष्टीने काय आवश्यक आहे त्याबाबत आपल्याला कल्पना द्यावी. आपण त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करेल असेही ते म्हणाले. मात्र, फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊ नये असे आवाहन केले. हत्ती पकडण्याबाबतचे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. लवकरच हायकोर्टाची ६ वकिलांची समिती परिसरातील शेतकऱ्यांना भेटून चर्चा करेल आणि आपला अहवाल कोर्टाला सादर करेल. कोर्टाचा निर्णय येईपर्यंत हत्ती पकडण्याची थेट मोहीम राबवता येणार नाही.

हत्तींसाठी कोल्हापूर येथील चंदगड घाटकरवाडी व तिलारी परिसरात निवासस्थान/कॅम्प बनवण्याचा वनविभागाचा विचार आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ आणि चंदगडमध्ये २ असे एकूण ८ हत्ती आहेत. हायकोर्टाच्या निर्णयानंतर पुढील निर्णय वन विभाग घेणार आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, माजी पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ, राजू शेटकर, नेमळे सरपंच दीपिका भैरे, उपसरपंच सखाराम राऊळ, माजी उपसरपंच विक्रम पांगम, नितीन पांगम, लवू चव्हाण, सुहास पिकुळकर, सचिन मुळीक, राजू कोळेकर, लीलाधर राऊळ, बाबी राऊळ, बाळकृष्ण राऊळ, ओंकार राऊळ, निवृत्ती मुननकर, दत्तप्रसाद चव्हाण, राजेश धुरी, सुनील राऊळ, अशोक धुरी यांसह अनेक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

मालवणच्या आनंदव्हाळ-भोसलेवाडीत नळपाणी योजनेच्या कामानंतर उघडे चर
November 17, 2026
Bhuvanesh Malkar from Karivade village in Sawantwadi, who worked as a Prep Artist on the Ramayana and Toxic films through DNEG.
Ramayana Movie : 'रामायण’च्या भव्य निर्मितीत सावंतवाडीच्या सुपुत्राची झेप
November 17, 2026
सिंधुदुर्गात '१७ मराठा रुईवा परिवाराचा' ६४ वा रेजिंग डे उत्साहात साजरा
November 17, 2026
Nitesh Rane Meets Deepak Kapoor Over Sindhudurg Flight Connectivity
Sindhudurg Navi Mumbai Flight Service : चिपी–नवी मुंबई विमानसेवा सुरू
November 17, 2026
संबंधित बातम्या

View all

मालवणच्या आनंदव्हाळ-भोसलेवाडीत नळपाणी योजनेच्या कामानंतर उघडे चर
November 17, 2026
Bhuvanesh Malkar from Karivade village in Sawantwadi, who worked as a Prep Artist on the Ramayana and Toxic films through DNEG.
Ramayana Movie : 'रामायण’च्या भव्य निर्मितीत सावंतवाडीच्या सुपुत्राची झेप
November 17, 2026
सिंधुदुर्गात '१७ मराठा रुईवा परिवाराचा' ६४ वा रेजिंग डे उत्साहात साजरा
November 17, 2026
न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर
November 17, 2026