
सिंधुदुर्गनगरी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषद आणि क्रीडा संकुल परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते.
५ जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने दुपारी ३ ते ५ या कालावधीत जिल्हा परिषद संकुल परिसर आणि जिल्हा क्रीडा संकुल परिसरात आज वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर ,जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, सभापती प्रितेश राऊळ संतोष साटविलकर, अनुराधा नारकर, खातेप्रमुख अधिकारी कर्मचारी मोठ्या संखेने या उपक्रमात सहभागी झाले होते . सहभागी झालेल्या सर्वानी प्रत्येकी एक झाड़ या प्रमाणे सुमारे ३७२ झाडांची लागवड आज करण्यात आली . तर लावलेल्या झाडाचे संगोपन करून ते जगविन्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली आहे .
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज वृक्ष लागवड करण्यात आली असली तरी पावसाचा अंदाज घेऊन पुढील पंधरा दिवस जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.पुढील १५ दिवस "वृक्ष लागवड पंधरवडा" त्यासाठी विविध शासकीय नर्सरी मधून १३,९५० झाडे खरेदी केली असून ती जिल्ह्यात वितरित करण्यात आले आहे . आज पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावरही वृक्ष लागवड करण्यात आली असून पुढील पंधरा दिवस वृक्ष लागवडीचा उपक्रम सुरूच राहणार आहे. पावसाचा अंदाज घेऊन वृक्ष लागवड करण्याच्या सूचना सर्व संबंधित विभागांना दिले आहेत.
झाडे लावा, झाडे जगवा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून की सर्व झाडे जगविण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत आजच्या या वृक्ष लागवड उपक्रमामध्ये जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी आणि पदाधिकारी, कर्मचारी एकत्रित येऊन आज वृक्ष लागवडीचा उत्सव साजरा करण्यात आला. यापुढेही पंधरा दिवस हा उपक्रम सुरू ठेवण्यात येईल यामध्ये शेतकरी, संस्था, विद्यार्थी यांचा सहभाग घेतला जाणार आहे. तरी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी एक झाड आईच्या नावे हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी वृक्ष लागवड करावी व त्याची जतन करावे आजच्या या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाडे लावा व ती जगवा असा संदेश यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिला आहे.











