LIVE UPDATES

देवगडमध्‍ये संजय गांधी योजनेच्‍या 23 प्रस्‍तावांना मंजूरी

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 29, 2026 19:58 PM
views 14  views

देवगड : देवगड तहसीदार कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्‍न झाली. विधवा लाभार्थ्‍यांचे दोन प्रस्‍ताव, परितक्‍त्‍या एक, दिव्‍यांग नऊ आणि श्रावण बाळ योजनेचे अकरा असे एकूण 23 प्रस्‍ताव मंजूर करण्‍यात आले असून त्रृटीच्‍या पुर्ततेवर दोन प्रस्‍ताव प्रलंबित ठेवण्‍यात आले आहे.

देवगड तालुक्‍यातील संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्‍यक्ष मिलींद साटम यांच्‍या अध्‍यक्षतेखाली २९ जुलै रोजी तह‍सीलदार देवगड यांच्‍या दालनात बैठक झाली. या बैठकिला देवगड तहसीलदार शीतल जाधव, गटविकास अधिकारी निलेश जगताप, मुख्‍यकार्यकारी अधिकारी यांचे प्रतीनिधी स्‍वप्‍नील बुचडे, सदस्‍यशुभांगी राणे, दिलीप वाडेकर, वैभव करंगूटकर, मनोज जाधव, सुहास राणे, प्रकाश राणे, नायब तहसिलदार संतोष खरात, सहाय्यक महसूल अधिकारी सुधीर साळूंखे आदी उपस्थित होते. समीतच्‍यावतीने नुतन तहसीलदार श्रीम. जाधव यांचा पुष्‍प्‍गुच्‍छ देवून सन्‍मान करण्‍यात आला. या बैठकित एकूण २५ प्रस्‍ताव मंजूरी साठी ठेवण्‍यात आले होते. यापैकी दोन प्रस्‍ताव त्रृटीच्‍या पुर्ततेकरीता प्रलंबीत ठेवण्‍यात आले आहेत.

देवगड तालुक्‍यातील ज्‍या लाभार्थ्‍यांचे प्रस्‍ताव मंजूर करण्‍यात आले आहेत, यामध्‍ये वृषाली रामचंद्र मासये रा.वानिवडे, विनिता विनोद मेस्त्री रा.गढीताम्हाणे, पुनम पंढरीनाथ घाडी रा.साळशी ,वर्षा विलास राणे रा.हिंदळे, संतोष गंगाराम कोकाटे रा.फणसगांव, मेहेक प्रविण जाधव रा.वाडा, योगिता यशवंत तिर्लोटकर रा.तिर्लोट, अनाजी राजाराम घाडी रा.दहिबांव, सक्षम भुषण फडके रा.वाडा, संकल्प सुभाष राउत रा.दाभोळे, विश्वनाथ शांताराम माळवदे रा.शिरगांव,प्रांजल अमित तोरस्कर रा.देवगड, कृष्णा पुंडलिक तानवडे रा.धालवली, दामोदर फटु कदम रा.दहिबांव, मनीषा मनोहर घाडी रा.साळशी ,दत्ताराम सदाशिव कोतेकर रा.वानिवडे, दशरथ रावजी कावले रा.जामसंडे, प्रकाश विठोबा वाघरे रा.धालवली, मनोहर राजाराम लाड रा.कुवळे,सुरेखा रामचंद्र लोके रा.मिठबांव,दिलीप श्रीधर मिठबावकर रा.वळीवंडे, जयप्रकाश विठोबा धुरी रा.चांदोशी,माधवी मिलिंद माळवदे रा.साळशी आदी लाभार्थ्‍यांचा समावेश आहे.