
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील बिलांवर बनावट सह्या केल्याप्रकरणी ठेकेदार संशयित ओंकार पाताडे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पाताडे यांच्यावतीने ऍडव्होकेट संजना संग्राम देसाई यांनी काम पाहिले.
बांधकाम विभागातील 12 बिलांवर कार्यकारी अभियंतांच्या बनावट सह्या करण्यात आल्या होत्या. त्यातील एक बिल अदाही करण्यात आले होते. या प्रकरणी कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यानंतर 16 जून रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी संबंधित बिलांच्या संबंधित असलेल्या पाच ठेकेदारांविरोधात गुन्हे दाखल केले होते. त्यामधील संशयित मोहन विद्याधर केळुसकर,रा. कणकवली, संशयित ओंकार नंदकुमार पडते, राहणार कुडाळ यांना यापूर्वीच न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आता या प्रकरणी संशयित आरोपी ओंकार तुळशीराम पाताडे यांनाही सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये ओमकार पाताडे यांच्यावतीने एडवोकेट संजना देसाई यांनी काम पाहिले. याप्रकरणी आणखी दोन संशयित आरोपी असून त्यांची नावे मंदार दामोदर आणि लक्ष्मण राऊळ अशी आहेत












