LIVE UPDATES

दिवंगत नायब तहसीलदारांच्या मुलीला अवघ्या २० दिवसांत अनुकंपा नियुक्ती

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 27, 2026 03:33 PM
views 176  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले दिवंगत नायब तहसीलदार मनोज शंकर मुसळे यांच्या मुलीला अनुकंपा तत्त्वावर अवघ्या २० दिवसांत शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संवेदनशीलतेने आणि तत्परतेने निर्णय घेत कु. सानिका मनोज मुसळे यांना ग्राम महसूल अधिकारी पदाचा नियुक्ती आदेश प्रदान केला. 

नायब तहसीलदार कै. मनोज शंकर मुसळे यांचे ११ ऑगस्ट २०२६ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले होते. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळावे, या उद्देशाने त्यांची मुलगी कु. सानिका मुसळे यांनी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत नियुक्ती मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर केला होता.

या अर्जाची दखल घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून अर्ज सादर केल्यापासून अवघ्या २० दिवसांत नियुक्ती आदेश देण्यात आला. सोमवारी दि. २६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या हस्ते कु. सानिका मुसळे यांना ग्राम महसूल अधिकारी (सजा तरंदळे, तहसीलदार कार्यालय, कणकवली) या पदाचा नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आला.

शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला कठीण काळात आधार देण्याच्या दृष्टीने अनुकंपा नियुक्ती महत्त्वाची ठरते. प्रशासकीय प्रक्रियेत संवेदनशीलता आणि तत्परतेला प्राधान्य देत जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे मुसळे कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. याबद्दल मुसळे परिवाराने जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.


ताजी बातमी

View all

Maharashtra government decision on supernumerary posts for 14,747 eligible NHM contractual health workers
राज्यातील १४ हजार ७४७ कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
October 27, 2026
सिंधुदुर्ग जिल्हा संस्था संगणकीकरणात राज्यात आणि देशात प्रथम क्रमांकावर : भवानी शंकर
October 27, 2026
Sindhudurg Local Crime Branch arrests absconding suspect in Pune in Kudal crime case
Kudal Crime News : कुडाळमधील गुन्ह्यातील फरार संशयिताला पुण्यातून घेतले ताब्यात
October 27, 2026
सावंतवाडी नगरपालिकेतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी काँग्रेस करणार
October 27, 2026
संबंधित बातम्या

View all

सिंधुदुर्ग जिल्हा संस्था संगणकीकरणात राज्यात आणि देशात प्रथम क्रमांकावर : भवानी शंकर
October 27, 2026
सावंतवाडी नगरपालिकेतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी काँग्रेस करणार
October 27, 2026
बांद्यात दिवाळीनिमित्त डबलबारीचा जंगी सामना, नरकासुर स्पर्धेचेही आयोजन
October 27, 2026
बांदा येथे ७ नोव्हेंबरला नरकासुर स्पर्धेचे आयोजन
October 27, 2026