LIVE UPDATES

श्री पंचम खेमराज विधी महाविद्यालयात नव्या विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रम

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 24, 2026 08:07 PM
views 26  views

सावंतवाडी : येथील श्री पंचम खेमराज विधी महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी शनिवारी २४ ऑक्टोबर रोजी ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना कायद्याच्या अभ्यासक्रमाची प्राथमिक माहिती मिळावी, महाविद्यालयातील प्राध्यापकांशी संवाद साधता यावा आणि नवीन विद्यार्थ्यांमध्ये परस्पर परिचय वाढावा, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, विद्यापीठ नोंदणीची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच नियमित व्याख्याने सुरू होणार असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

या ओरिएंटेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकमेकांशी परिचित होण्याची संधी मिळाली. तसेच कायद्याच्या अभ्यासक्रमासंदर्भात प्राथमिक मार्गदर्शन मिळण्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग आणि नवागत विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद निर्माण होण्यास मदत झाली.

कायद्याचे शिक्षण घेताना आवश्यक असलेली शिस्त, अभ्यासाची दिशा आणि महाविद्यालयीन वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी अशा कार्यक्रमांचा उपयोग होतो. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या नव्या शैक्षणिक प्रवासाची सकारात्मक सुरुवात झाली. नवीन मित्र-मैत्रिणी, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि विधी क्षेत्रातील करिअरच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी यामुळे हा ओरिएंटेशन कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला. नव्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करताना विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.