
सावंतवाडी : प्राथमिक आरोग्य केंद्र आंबोली येथे सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २२ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते . यावेळी जिल्हा प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्ग येथील वैद्यकीय अधिकारी , आरोग्य सहाय्यक, सी . पी .एच .सी मास्टर ट्रेनर उपस्थित होते . या कार्यक्रमादरम्यान उपस्थित कर्मचाऱ्यांना प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी आंबोली आरोग्य केंद्र , बांदा, निरवडे येथील आशा स्वयंसेविका , आरोग्यसेवक , समुदाय आरोग्य अधिकारी, गतप्रवर्तक आणि १० मास्टर ट्रेनर उपस्थित होते . तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप पोतदार ,डॉ वैभव पाटील ,शंकर परब ,आरोग्य सहाय्यक शिरोमणी साळुंके आदी उपस्थित होते . सदर प्रशिक्षण डॉ रमेश कर्तस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले .
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








