
सिंधुदुर्गनगरी : आजच्या धकाधकीच्या आयुष्यात मानसिक ताण, चिंता, नैराश्य यांसारख्या समस्या वाढत आहेत. अशावेळी वेळेवर मदत घेणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्र सरकारची ‘टेलिमानस’ (Tele-MANAS) टोल फ्री हेल्पलाइन १४४१६ ही मोफत सेवा कोणत्याही मानसिक आरोग्य समस्यांसाठी नागरिकांना २४x७ उपलब्ध आहे. प्रशिक्षित मानसोपचारतज्ञ व समुपदेशक त्वरित मार्गदर्शन करून नागरिकांना भावनिक तणावातून बाहेर पडण्यास मदत करतात. सर्व कॉल्सची गोपनीयता जपली जाते.
टेलिमानस सेवा कोणासाठी ?
- मानसिक ताण-तणाव, चिंता
- नैराश्य
- व्यसन समस्या
- कौटुंबिक / नातेसंबंधातील तणाव
- मुलांचे मानसिक प्रश्न
- परीक्षेचा ताण
- भिती, अस्वस्थता, अत्याधिक विचार
- आत्महत्येचे विचार / तातडीची भावनिक अस्थिरता
- आर्थिक किंवा वैयक्तिक तणाव
वरील कोणतीही लक्षणे जाणवल्यास १४४१६ वर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग तर्फे करण्यात आले आहे. मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट करून, मदत घेण्यास संकोच न करण्याची विनंती करण्यात आली आहे.














