
सावंतवाडी : आयुष मंत्रालय आयुर्वेद संस्था गोवा या हॉस्पिटलची सावंतवाडी येथे ओ. पी. डी करण्याबाबत माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आयुर्वेद संस्था धारगळ गोवा येथे बैठक घेतली. येथे चर्चा केल्यानंतर सावंतवाडी येथे आयुष हॉस्पिटलची ओपीडी सावंतवाडी लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे सावंतवाडी येथे 'आयुष' हॉस्पिटलची ओपीडी लवकरच सुरू होणार असून यामुळे आरोग्य सुविधेत मोठी भर पडणार आहे. धारगळ (गोवा) येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये श्री. केसरकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना आयुर्वेदातील जागतिक दर्जाच्या उपचार पद्धतीचा लाभ मिळावा, यासाठी सावंतवाडीत या संस्थेची ओपीडी सुरू करण्याची मागणी श्री. केसरकर यांनी केली होती. या चर्चेअंती प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच ही सेवा कार्यान्वित होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी आयुष मंत्रालय आयुर्वेद संस्था गोवा यांच्या डॉक्टरांसह परिक्षित मांजरेकर, अर्चित पोकळे उपस्थित होते














