
ओपीडी सेवा १ मार्च पासून
सावंतवाडी : डॉ. ऋत्विज पाटणकर यांची शहरातील नामांकित वैद्यकीय संस्था कोस्टल युरोकेअर युरोलॉजी क्लिनिकचा उद्घाटन समारंभ रविवार २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता पाटणकर गॅस सर्व्हिस जवळ असलेल्या राजरत्न कॉम्प्लेक्स, सावंतवाडी येथे संपन्न होणार आहे.
या नव्या उपक्रमामुळे रुग्णांना तज्ज्ञ युरोलॉजी सेवा उपलब्ध होणार असून, मूत्रविकारांवरील तपासणी, निदान व उपचारांची सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहे. कामकाजाच्या धावपळीत नियमित वेळेत उपचार घेणे शक्य न होणाऱ्या रुग्णांसाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरणार आहे. क्लिनिकची ओपीडी सेवा १ मार्च २०२६ पासून नियमितपणे सुरू होणार असल्याची माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तरी या युरोलॉजी क्लिनिकच्या उद्घाटन समारंभाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे.














