
सावंतवाडी : विधानसभा भाजपा तर्फे विधानसभेतील १७ जि. प. मध्ये व तिन्ही शहरामध्ये योगाचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी योगाचा कार्यक्रम घेण्यासोबतच योगा सेंटर सुरू करणार असल्याचा विश्वास भाजपा युवानेते विशाल परब यांनी व्यक्त केला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फिट इंडियाचा मंत्र घेऊन योगाचा जास्तीत जास्त प्रसार करत आहे. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभेत योगा सेंटर सुरू करण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असे प्रतिपादन भाजपा युवानेते विशाल परब यांनी केले.
सावंतवाडी येथील मांगिरीश हॉल येथे फिटनेस योग फाउंडेशन महाराष्ट्र तर्फे आज सावंतवाडीतील योगा प्रशिक्षण शिबीरात सहभागी झालेल्यांना आज श्री. परब यांच्याहस्ते प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. यावेळी योगा प्रशिक्षक शेखर बांदेकर, संस्थेचे यशवंत आरोसकर, शिवा गावडे, निशिगंधा सावंत, रेवती सावंत तथा सर्व योग प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








