
दोडामार्ग : गोवा कासारपाल येथे दोडामार्ग सीमेवर असलेल्या सरकारी उच्च माध्यमिक शाळेत भव्य विनामूल्य वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन शिक्षा व्हिजन डिचोली आणि व्हिजन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार डॉ. चंद्रकांत पी. शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉ. उमेश देसाई होते, तर सौ. सिद्धी खानोलकर यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली. तसेच प्रदीप रेवोडकर (जि.प. लाटांबरसे), माजी सरपंच व पंच पद्माकर माळी, पंच नरेश गावस व सौ. पूजा घाडी (ग्रामपंचायत लाटांबरसे), तुलशिदास गावकर, माजी पंच श्याम हरमलकर यांचीही उपस्थिती लाभली.
या शिबिराला परिसरातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, लाटांबरसेम परिसरातील तब्बल ६०० पेक्षा अधिक नागरिकांनी या वैद्यकीय तपासणी शिबिराचा लाभ घेतला. शिबिरात विविध तज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा निःशुल्क दिली. यात डॉ. आशिष ठाकरकर, फिजिशियन, डॉ. सिंधू अर्जुन, नेफ्रोलॉजिस्ट, डॉ. अमेय स्वर, ऑर्थोपेडिक तज्ञ, डॉ. सुप्रिया शेट्ये, एम.डी.एस. दंतचिकित्सक, डॉ. प्रियांका धवजेकऱ, स्त्रीरोगतज्ज्ञ, डॉ. दत्तराज बुधकुळे, सर्जन, डॉ. अंकिता प्रभुदेसाई, त्वचारोगतज्ज्ञ, डॉ. गोविंद भुसकुटे, कान-नाक-घसा तज्ञ, डॉ. तेजा मर्दोलकर, फिजिओथेरपिस्ट यांचा समावेश होता.
सर्व वैद्यकीय सल्लामसलत व तपासण्या पूर्णपणे विनामूल्य करण्यात आल्या, ज्यातून समाजाच्या आरोग्यवर्धनासाठी संस्थेची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व स्वयंसेवक, मान्यवर, वैद्यकीय अधिकारी व स्थानिक नागरिक यांचे विशेष योगदान लाभले.
या शिबिराच्या माध्यमातून डिचोली, कसर्पाल व आसपासच्या नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.