नेरूर शाळेत महिला दिन उत्साहात

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 10, 2026 11:38 AM
views 43  views

कुडाळ : जागतिक महिला दिनानिमित्त खा. प. शाळा नेरूर करमळगाळव आणि अंगणवाडी करमळगाळव यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात पालकर, सडवेलकर चौधरी, गावडे, शिरसाट, बाईत, गावडे, दांडेकर या पालकांनी विविध चविष्ट पदार्थ सादर केले. उपस्थितांनी स्पर्धेचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांना सौर लॅम्पचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्रकाश राणे, सदस्य सुनील दांडेकर, दीपक गावडे, रवी वारंग, राणे मॅडम, मुख्याध्यापक सचिन तुळसुलकर, उपशिक्षक अमोल तांबे आदी उपस्थित होते.