उंबर्डेचे सुपुत्र संदेश तुळसणकर ‘युवा समाज गौरव पुरस्काराने’ सन्मानित

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 10, 2026 10:48 AM
views 110  views

वैभववाडी : उंबर्डे  कुंभारवाडीचे सुपुत्र व शिक्षक संदेश तुळसणकर यांना ‘युवा समाज गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ आणि सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाज समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अध्यक्ष पुरस्कार सतीश कुंकळीकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.  श्री. तुळसणकर हे शिक्षकी पेक्षात काम करत आहेत. तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. समाजातील युवकांना प्रेरणा देणारे कार्य तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाला संस्थापक प्रदेशाध्यक्ष सतीश दरेकर (पुणे), कोकण विभागाध्यक्ष प्रकाश साळवी, प्रदेश सरचिटणीस विलास गुडेकर, प्रदेश उपाध्यक्ष यशवंत शेदुलकर, कार्याध्यक्ष महेश सायकर, केईएम हॉस्पिटल मुंबईचे डॉ. सुरेश काळे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाज समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कुंभार, सचिव महेश कुंभार व उपाध्यक्ष दिलीप सांगवेकर उपस्थित होते. यावेळी संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्गचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री तुळसणकर यांच्या या निवडीनंतर सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.