
कणकवली : संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त शिरवल खासकीलवाडी येथे यंदाही विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या आठ वर्षांपासून संदीप चौकेकर व त्यांचे मित्र मंडळ नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवत आहेत.
यंदा ११ ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता घटस्थापना 12 वाजता आरती तीर्थप्रसाद आणि रात्री 8 वाजता बुवा अमित मेस्त्री यांचे भजन,१७ ऑक्टोबर दुपारी ०१ वा. भंडारा (महाप्रसाद)सायं. ०४ ते ०६ वा.: हळदी कुंकू
संध्या. ०८ वा. महाप्रसाद रात्री १० वा डबलबारी भजन जुगलबंदी सामना बुवा मकरंद मोडक व बुवा स्वप्निल गोसावी यांच्यात होणार आहे .18 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता होम मिनिस्टर हे महिलांसाठी खास आकर्षण असणार आहे यामध्ये आकर्षक पैठणी असणार आहे आणि 19 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता कुलवंताची सून दशावतारीनाट्यप्रयोग असे विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. यामध्ये भजन, डबलबारी, होम मिनिस्टर, दशावतार नाटक यांसह विविध धार्मिक, सांस्कृतिक तसेच समाजहिताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विविध कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
गेली आठ वर्षे सातत्याने नवरात्रोत्सवाचे आयोजन करून धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम संदीप चौकेकर व मित्र मंडळाकडून सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रोत्सवाकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.












