LIVE UPDATES

पडेल येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा २३ वा वर्धापन दिन २८ नोव्हेंबरला

महिलांचा डबल बारीचा जंगी सामना रंगणार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 18, 2026 12:38 PM
views 23  views

देवगड : पडेल येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा कलशारोहण व अर्चा विधीचा २३ वा वर्धापन दिन सोहळा कार्तिक कृ. पंचमी शनिवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. श्री देव रवळनाथ मंदिर उत्सव समिती पडेल यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष केवल ठाकूरदेसाई यांनी केले आहे.

या सोहळ्याची सुरुवात सकाळी आठ वाजता लघुरुद्र अभिषेक आणि श्री सत्यनारायणाची महापूजा या धार्मिक विधींनी होणार असून दुपारी बारा ते तीन या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी तीन ते आठ या वेळेत स्थानिक भजनांचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर रात्री नऊ वाजता महिलांचा डबल बारीचा जंगी सामना रंगणार आहे.

या सामन्यात साची मुळम पुरळ हुरशी विरुद्ध कु. तेजल जाधव धोपावे गुहागर यांच्यात सामना होणार असून या सामन्याकडे सर्व भाविकांचे लक्ष लागले आहे. या वर्धापन दिन सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

दादा कोंडके यांच्या बहारदार गीतांचा रंगणार सुरेल कार्यक्रम
November 18, 2026
मुख्याध्यापक वामन तर्फे यांच्या मातोश्री सीताबाई तर्फे यांचे निधन
November 18, 2026
Mahamari Vishuchika Dashavatar Natak by Balakrishna Gore Natya Mandal
धूप-कापूर, मोर अन् कोंबड्याचं गूढ! कोकणात धुमाकूळ घालतोय ‘महामारी विशुचिका’ नाट्यप्रयोग
November 18, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News: ठाकरे शिवसेनेचे शहर प्रवक्ते आशिष सुभेदार यांचे निधन
November 18, 2026
संबंधित बातम्या

View all

मुख्याध्यापक वामन तर्फे यांच्या मातोश्री सीताबाई तर्फे यांचे निधन
November 18, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News: ठाकरे शिवसेनेचे शहर प्रवक्ते आशिष सुभेदार यांचे निधन
November 18, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
कवयित्री डॉ. शरयू आसोलकर श्रद्धांजली सभा
November 18, 2026
Sindhudurg Nagari Water Supply Reduced Due to Water Shortage
सिंधुदुर्गनगरीत दररोज अर्धा तास पाणीकपात
November 17, 2026