LIVE UPDATES

मोटार पंप दुरुस्तीवरून दोन भावांमध्ये मारामारी

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: May 05, 2026 20:30 PM
views 225  views

कणकवली : मोटर पंप दुरुस्तीच्या कारणावरून दोन भावांमध्ये मारामारी झाली. याबाबत रवींद्र आत्माराम  मस्के (49) व आत्माराम मस्के (42, दोन्ही रा. कासार्डे धुमाळवाडी) हे दोन्ही भाऊ तक्रार देण्यासाठी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.

रवींद्र मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, रवींद्र मस्के हे मोटरसायकलवरून  वाडीतील शेतात मोटर पंप चालू करण्यासाठी जात होते. यादरम्यान गांगेश्वर मंदिरानजिक लहान भाऊ उदय मस्के याने त्यांना अडवले. तसेच मोटर पंप दुरुस्तीचे पैसे देत नाही तोपर्यंत तू मोटर चालू करायची नाहीस असे म्हणत शिवीगाळ करू लागला. तसेच लोखंडी सळीने उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत केली.

रवींद्र मस्के यांना खाली पाडून हाता पायाने मारहाण केली. पुतण्या  व मला जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. तर उदय मस्के यांच्या फिर्यादीवरून रवींद्र मस्के यांच्यावर गुन्हा दाखल  करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.