LIVE UPDATES

Sindhudurg Crime : सोन्याची चैन लांबवणारे पसार संशयित ताब्यात

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 03, 2026 10:36 AM
views 46  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी :  तालुक्यातील पारपोली येथे अंगाला मालिश करण्याचा बहाणा करून घरकाम करणाऱ्या महिलेच्या ६५ वर्षीय पतीची फसवणूक करत ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लांबवणाऱ्या दोन संशयितांना सावंतवाडी पोलिसांनी कुडाळ येथून ताब्यात घेतले. 

सुभाष प्रल्हाद चव्हाण (वय ३६) आणि संभाजी रामचंद्र चव्हाण (वय ५२, दोघे रा. रूपडी, हातकणंगले, कोल्हापूर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान, दोन्ही संशयितांना सोमवारी २ नोव्हेंबर रोजी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.  २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास पारपोली गावठणवाडी येथे घडला होता.

फिर्यादी रमेश केशव परब (वय ६५) हे आपल्या पत्नीसह घरी असताना दोन अज्ञात व्यक्ती काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून त्यांच्या घरी आले होते. त्यातील एकाने फिर्यादीला हातापायाचे मालिश करून देतो असे सांगून विश्वासात घेतले आणि पायाला मालिश करत गळ्यातील सोन्याची चैन काढून बाजूला ठेवायला सांगितली. त्यानंतर ते दोघेही व्यक्ती मोटारसायकलवरून निघून जाताना बाजूला काढून ठेवलेली सुमारे १० ग्रॅम वजनाची आणि ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लबाडीने चोरून नेल्याचे निष्पन्न झाले होते.

याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंगे, पोलीस हवालदार शिंदे आणि पोलीस अंमलदार ९८३ यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मनीष शिंदे करत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी आंबोली तसेच दाणोली बाजार व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयितांनी वापरलेली दुचाकी व वर्णनानुसार व्यक्ती दिसून आल्या. त्यानंतर दुचाकीच्या क्रमांकावरून मालकाचा शोध घेतला असता, संबंधित व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील असल्याचे निष्पन्न झाले. सावंतवाडी पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन कुटुंबाकडे चौकशी केली असता, ते कुडाळ येथे गेल्याचे समजले. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी कुडाळ येथील एका लॉजमधून दोघांनाही ताब्यात घेतले.


ताजी बातमी

View all

४९ वी नाथ पै एकांकिका स्पर्धा २४ डिसेंबरपासून कणकवलीत रंगणार
November 03, 2026
Political controversy over Pinguli Pazar Lake conservation and development in Kudal, Sindhudurg.
Pinguli Pazar Lake : “आमदारांच्या दोन बैठकांना गैरहजर, आता उपोषणाचा फार्स कशासाठी?”
November 03, 2026
Mangaon Valley farmers in Sindhudurg awaiting ownership rights for Akaripad lands following High Court order.
Sindhudurg Akaripad Land Issue : आकारीपडच्या १,४४४ शेतकऱ्यांना दिलासा
November 03, 2026
दुष्काळग्रस्त राजापूर तालुक्यात जलसंधारणासाठी पोलिसांचे श्रमदान
November 03, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad News : देवगड समुद्रात कर्नाटकची ‘सुलतान’ नौका ताब्यात
November 03, 2026
Police and bomb detection squad conduct a security check at Rajapur Civil Court in Ratnagiri following a bomb threat email.
Rajapur Court Bomb Threat : रत्नागिरी, सिंधुदुर्ग पाठोपाठ राजापूर न्यायालयालाही बॉम्बची धमकी
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg District Court : सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Kankavli News : बंधाऱ्याच्या कामासाठीच्या 153 लोखंडी प्लेट्स चोरीला
November 01, 2026