LIVE UPDATES

दोडामार्गात सुरक्षारक्षकाचा ऑन ड्युटी मृत्यू

शरीरावर जखमा असल्याने घातपाताचा संशय
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 22, 2026 12:44 PM
views 304  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

दोडामार्ग :  दोडामार्ग वझरे येथील आंगन प्रकल्पाचे सुरक्षा रक्षक मोहन वासूदेव गवस यांचा ऑन ड्युटी मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी उघडकीस आली. मृत मोहन गवस यांच्या शरीरावर जखमा असल्याने त्यांचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईक व ग्रामस्थांनी व्यक्त करत दोडामार्ग पोलिसात धाव घेतली आहे. यांनंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा सुरु केला.

 गवस यांचा ऑन ड्युटी मृत्यू झाल्या नंतर परस्पर मृतदेह  नातेवाईकांना कोणतीही कल्पना न देता दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नेल्याचा नातेवाईकांनी आरोप केला. या सर्व आरोपांचा दोडामार्ग पोलीस तपास करीत आहेत.