
वैभववाडी : सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या दुर्वाक्षी दीपक फाटक हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात आले. या अभियानांतर्गत जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या शिक्षण विभागामार्फत ५ ऑक्टोबरला ‘विकसित भारत २०४७’ या विषयावर जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत अर्जुन रावराणे विद्यालयाची विद्यार्थिनी दुर्वाक्षी फाटक हिने इयत्ता आठवी ते दहावीच्या गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. दुर्वाक्षीच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी तिचे अभिनंदन केले. यावेळी मुख्याध्यापक भास्कर नादकर, शिक्षिका संगीता पाटील, कलाशिक्षक मंदार चोरगे, लिपिक स्वप्नील बावदाणे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दुर्वाक्षीच्या यशाबद्दल प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी तिचे कौतुक केले.









