LIVE UPDATES

वर्देतील दामिनी पालव खूनप्रकरणाचा तपास सुरूच

नव्या माहितीच्या प्रतीक्षेत पोलीस
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 21, 2026 08:39 PM
views 75  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील दामिनी पालव खूनप्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, या प्रकरणात आणखी काही महत्त्वाची माहिती हस्तगत करण्यासाठी प्रयत्न चालू असून या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी बुधवारी दामिनी पालव यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मात्र, या भेटीदरम्यान तसेच आतापर्यंतच्या तपासात विशेष नवीन माहिती हाती लागली नसल्याचे पोलीस निरीक्षक बडवे यांनी स्पष्ट केले.

या खूनप्रकरणात पोलिसांनी हस्तगत केलेला चाकू घटनास्थळापासून काही अंतरावर आढळून आल्याची माहितीही बडवे यांनी दिली. त्यामुळे या प्रकरणातील घटनाक्रम आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलीस पुढील तपास करीत आहेत.दामिनी पालव यांच्यावर चाकूने दहा पेक्षा अधिक वार करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक बडवे यांनी स्पष्ट केले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस यंत्रणेकडून तपास सुरू आहे. दामिनी पालक हिचा व साहिल धुरी याचा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे. घटनास्थळावरून हस्तगत करण्यात आलेला चाकू तसेच या प्रकरणाशी संबंधित अन्य पुराव्यांच्या आधारे पुढील तपासाला दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.  पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक बडवे यांनी बुधवारी दामिनी पालव यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

मात्र, या भेटीदरम्याच्या तपासात विशेष नवीन माहिती हाती लागली नसल्याचे पोलीस निरीक्षक बडवे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील संशयित साहिल धुरी याची पोलीस कोठडी २४ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यामुळे त्याच्या कोठडीच्या कालावधीत तपासादरम्यान काही नवीन बाबी समोर येतात का, याकडे लक्ष लागले आहे. तपासातून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतात का, यावर या प्रकरणाच्या पुढील तपासाची दिशा अवलंबून असेल.

दामिनी पालव आणि साहिल धुरी हा एकाच कॉलेजात शिकत असल्यामुळे पोलिसांची तपास सूत्रे कॉलेजच्या दिशेने वळणार का अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. दरम्यान, दामिनी पालव खूनप्रकरणातील तपासाबाबत परिसरात चर्चा जोरदार सुरू असून, या प्रकरणातील सर्व बाबींचा उलगडा होण्याची प्रतीक्षा आहे. पोलिसांच्या पुढील तपासातून या घटनेशी संबंधित अधिक माहिती समोर येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.