
सावंतवाडी : महादेव नानू तेली (वय 56, रा. माणगाव, ता. कुडाळ) हे बुधवारी रात्री 8 वाजता आपल्या घरी जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या मोटरसायकलने त्यांना जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला.
अपघातानंतर तेथील ग्रामस्थांनी तात्काळ त्यांना माणगाव उपआरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉ. सभा खान, डॉ. प्रभाकर शिंगाडे ,डॉ. स्वप्ना सागर यांनी त्यांच्यावर उपचार करून सिटीस्कॅन केले . त्यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली असून सध्या त्यांना पुढील उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजू मसुरकर यांनी दिली.या घटनेची माहिती सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून पोलिसांना कळविण्यात आली असून फरार दुचाकीस्वाराचा शोध सुरू आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








